सांगरूपकामध्ये उपमेयाची जितकी अंगे तितकीच उपमानाचीही समोरासमोर दाखवून रूपक पूर्ण करतात .
ओंकार या आध्य ब्रम्हरूपापासून चारी वेदांची निर्मिती झाली .त्याचे स्थूल रूप म्हणजे श्रीगणेश .सर्व शब्दब्रम्ह -वांग्मय विश्व त्यात सामावले आहे .
श्री ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने बनवलेली गणेशमूर्ती ही वैदिक वांग्मयाची असून तिची वस्त्रे ,अलंकार आणि आयुधेही वांग्मय रूप आहेत .अशा या मूर्तीचे दर्शन केवळ ज्ञानरूपी नेत्राने होऊ शकते .
वेद हे गणेशाची मूर्ती आहेत ,निर्दोष अक्षरे त्याचे अंग आहेत ,अवयव ज्याप्रमाणे शरीर बलवान करतात ,त्याप्रमाणे श्रुती वेदातील गूढ अर्थ स्पष्ट करतात ,म्हणून स्मृती हे गजाननाचे अवयव कल्पले आहेत .या स्मृतींच्या अर्थातील शोभाही त्याची लावण्याची ठेव म्हटले आहे ,तर बुद्धीतील ज्ञानाचा प्रकाश हा त्याचा स्वयंप्रकाश आहे ,
अठरा पुराणे हे रत्नखचित अलंकार आणि पुराणातील शब्दरचनेच्या कोंदणात सिद्धांत रुपी रत्ने बसविली आहेत .सुंदर शब्दरचना हे गणेशाचे वस्त्र आणि त्यातील अलंकार हे त्या वस्त्राचे तलम पोत आहे .कौतुक युक्त काव्य नाटके हे त्याचे पैंजण ,तर अर्थरूप आवाज हे पैन्ज्णांचे रुण झुण आवाज आहेत .या रचनातील पदेही सुंदर रत्ने आहेत .
व्यास इत्यादी प्रतिभावंतांची बुद्धी हा कमरेचा शेला आहे ,तर त्यांची प्रतिभा म्हणजे पदराच्या झळकणाऱ्या दशा आहेत .
ज्यांना सहा शास्त्रे म्हणतात ते सहा हात होत ,आणि वेगवेगळी मते ही आयुधे होत .तर्क हा परशु तर नीतिधर्म हा अंकुश आहे .वेदांतदर्शन हा ब्रह्म रसाने भरलेला मोदक आहे ,तर खंडित दात हा बौध्द मताचे प्रतिक आहे .कमळ धारण केलेला हात हा सत्कारवाद तर वरदहस्त ही धर्म प्रतिष्ठा आहे ..निर्मल असा विवेकविचार ही सरळ सोंड आहे .सर्वाना सारखे मानणारा पांढरा रंग असलेला दात म्हणजे योगसंवाद तर पूर्व आणि उत्तर मीमांसा हे दोन्ही कान आहेत .त्याचे स्मूक्ष डोळे ज्ञानरूप आहेत ,तर द्वैत आणि अद्वैत ही दोन मते त्याची गंडस्थळे आहेत .त्यातील प्रमेयरूपी पोवल्यानी ती सजवली आहेत .त्यावरचा बोधरूपी मद हे मुनिरूपी भ्रमर सेवन करत आहेत .जी दहा उपनिशीदे ज्ञानरूपी मध देतात ती मुकुटातील सुग्गंधी फुले आहेत .ओंकारातील अकारहे दोन पाय ,उकार हे विशाल उदर आणि मकार हे मस्तक होय .या ओंकारात सर्व वेद सामावतात .अशा या विश्वाच्या मूळ कारणास मी वंदन करतो ,असे श्री ज्ञानेश्वर म्हणतात .

No comments:
Post a Comment