योगाची आठ अंगे
1 यम -1 अहिंसा 2 सत्य 3 अस्तेय (दुसर्याच्या वस्तूबद्दल अभिलाषा न बाळगणे )4 ब्रम्हचर्य 5 अपरिग्रह (असंग्रह ) यम याचा अर्थ न बदलणारे ,देशकाल परीस्तीतीनुसार न बदलणारे शाश्वत गुण
2 नियम 1शौच (शरीरशुद्धी )2 संतोष 3 तप (व्रत वैकल्ये )4 स्वाध्याय (अभ्यास )5ईश्वर प्रणिधान (नामस्मरण ) नियम म्हणजे परिस्थितीनुसार बदलणारे गुण ,यांच्यामुळे धर्माची उत्क्रांती होत असते
यम नियम आपले जीवन व्रतस्थ बनवतात .
3 आसने
4 प्राणायाम
5 प्रत्याहार (इंद्रीयावरील ताबा )
6धारणा -सतत अभ्यासाने अंगी येणारे वैराग्य
7 ध्यान -धारणा आत्मसात केल्यावरच ध्यान पूर्णपणे साधते
8 समाधी -सर्वत्र सम भाव निर्माण झाला कि मी ध्यान करतो ही जाणीवही नाहीशी होते ,साध्य आणि साधन याची एकरूपता होते अशी स्थिती .
या आठ अंगाची ओळख अधिकारी व्यक्तीकडून करून घ्यावी लागते
असा योगी कसा दिसतो हे सांगताना भगवंत म्हणतात
तरी ज्याचिया इंद्रीयाचीया घरा।नाही विषयांचिया येरझारा ।जो आत्म बोधाचिया वोवरा ।पहुडला असे ।
जायचे सुख दुखाचेनी अंगे ।झगटले मानस चेवो नेघे ।विषयपासीही आलिया से न रिघे ।हे काय म्हणुनी ।
हे ऐकून चकित झालेला अर्जुन म्हणाला ,त्याला अशी योग्यता कोण देतो ?उत्तरादाखल भगवंत म्हणतात
उध्दरेत आत्मना आत्मानं नात्मानंवासादयेत ।आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ।5
आपण आपला उध्दार करावा ,आपला घात करू नाही ,आपण स्वतःच स्वतःचे मित्र आहोत ,स्वतःचे स्वतःच शत्रू आहोत .
No comments:
Post a Comment