जीवाची शक्ती कार्य रूप होताना ती सूक्ष्म नाड्यामधून वाहते .या नाड्या मांसमय नाहीत ,या शास्त्राने तुटत नाहीत ,अग्नीने जळत नाहीत ,शरीर राख झाले तरी त्या वासना रूपाने जीवाला बांधतात .इडा ,पिंगला व सुषुम्ना या तीन नाड्या आहेत .या नाड्या व चक्रे ही फक्त योग्यांना अनुभवाने जाणवतात .
1 आधार चक्र -हे चार दलाचे ,अग्नीप्रमाणे तेजस्वी आहे .हे गुद्स्थानाचे ठिकाणी आहे
वज्रासनात बसून उजव्या पायाच्या ताचेने हा भाग दाबला असता मुल बंध लागतो, आणि पोटातील अपानवायू कोंडला जातो .
वज्रासनात बसून उजव्या पायाच्या ताचेने हा भाग दाबला असता मुल बंध लागतो, आणि पोटातील अपानवायू कोंडला जातो .
2 स्वाधिष्ठान चक्र -हे सहा दलाचे ,सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे .ते लिंग स्थानी आहे .
3 मान्निपूर चक्र -हे दहा दलाचे ,रक्त वर्ण आहे .हे नाभिभागाजवळ आहे
बेंबीवर दाब देऊन पोट खपाटीला जाते ,तेंव्हा वोधीयाना बंध लागतो .
बेंबीवर दाब देऊन पोट खपाटीला जाते ,तेंव्हा वोधीयाना बंध लागतो .
4अनाहत चक्र -हे बारा दलाचे आहे ,सुवर्ण वर्णाचे आहे ,हृदयाजवळ याचे स्थान आहे
5 विशुध्द चक्र -हे सोळा दलाचे आहे ,याचा वर्ण चंद्रासारखा आहे
कंठ प्रदेशाजवळ याचे स्थान आहे .
जेंव्हा गळा आकुंचित होऊन हनुवटी गळ्याखाली अडकून छातीवर दाबून बसते ,तेंव्हा जालंधर बंध पडतो .
जेंव्हा गळा आकुंचित होऊन हनुवटी गळ्याखाली अडकून छातीवर दाबून बसते ,तेंव्हा जालंधर बंध पडतो .
या चक्राच्या डाव्या बाजूस इडा उजव्या बाजूस पिंगला व मध्य भागी सुषुम्ना नाडी आहे
6 आज्ञाचक्र -हे दोन दलाचे आहे .हे रक्तवर्ण आहे .हे दोन्ही भुवयामध्ये आहे ,
No comments:
Post a Comment