Friday, July 27, 2012

vibhutiyog

दहाव्या अध्यायाला विभूतियोग असे म्हटले आहे .विभूती =अधिक प्रमाणात ईश्वराचा अंश असणारी व्यक्ती
प्रतिविभूती =ईश्वरांशाचे जगतात दिसणारे प्रातिनिधिक स्वरूप ,हे अभिन्नत्व अर्जुनाला पटवून देणे हा या अध्यायाचा हेतू होय .सर्वात्मक ईश्वराची जाण येऊन जे जे भेटिजे भूत ते ते मानिजे भगवंत ही स्थिती येण्यासाठी अभेदभक्ती अंगी बाणवताना  विभूतींचे हे ज्ञान कामी येते .
भगवंत म्हणतात ,एका परमात्म्याचीच रूपे सर्वत्र आहेत ,.मी सर्वांचा आदि व निर्विषय असल्याने देव ,ऋषी ,वेद यांचेकडून जाणला जात नाही ,अशा आत्मतत्वाचे दर्शन अशक्य आहे ,पण इंद्रियास पाठमोरे होऊन भुतांच्या माथ्यावर चढले असता ते शक्य होते .
आपल्या विभूती असंख्य आहेत असे  सांगून मग भगवंत मुख्य 75 विभूतींचे कथन करतात
1बारा आदित्यामध्ये एक विष्णु ,2तेजस्वीपदार्था मध्ये एक सूर्य 3 वायुरुपामध्ये मी मरीचि 4नक्षत्रांमध्ये मी चंद्र 5वेदामध्ये मी सामवेद 6देवामध्ये मी इंद्र 7इंद्रीयामध्ये मी मन 8भुतांच्या ठिकाणी मी चेतना 9रुद्रामध्ये मी शंकर 10यक्ष राक्षसामध्ये मी कुबेर 11आठ वसु मध्ये मी अग्नी 12पर्वतामध्ये मी मेरू 13पुरोहीतामध्ये मी बृहस्पती 14सेनानाय्कांमध्ये मी कार्तिकेय 15जलाशयामध्ये मी सागर 16महारुशिमध्ये मी भृगु 17वाणीमध्ये मी ओम 18यज्ञामध्ये मी जप यज्ञ 19स्थावर पदार्थामध्ये मी हिमालय 20वृक्षामध्ये पिंपळ 21देवर्षी मध्ये नारद 22गन्धर्वांमध्ये चित्ररथ 23सिद्धांमध्ये कपिल महामुनी 24अश्वा मध्ये अमृत मंथनातून उत्पन्न झालेला उचैश्रवा 25गाजेन्द्रामध्ये ऐरावत 26नरामध्ये राजा 27आयुधामध्ये वज्र 28धेनुमध्ये कामधेनु 29षडरीपुत  काम 30सर्पामध्ये वासुकी 31नागामध्ये अनंत 32जलदेवता मध्ये वरुण 33पितरामध्ये  अर्यमा 34नियामका मध्ये यम 35दैत्यामध्ये प्रल्हाद 36हरण करणारामध्ये काल 37पशुमध्ये सिंह 38पक्ष्यामध्ये गरुड 39वेगवान वास्तूमध्ये वायू 40शस्त्र धारण कार्नारामध्ये राम 41मत्स्यामध्ये मकर 42नद्यात भागीरथी
43 अक्षरामध्ये अकार 44समासामध्ये द्वंद समास  मी   45काळ मी 46विश्वमुखी जगोत्पादक पुरुष मी 47सर्व संहारक मृत्यू मी 48ते 54स्त्रीलिंगीवस्तूमध्ये कीर्ती ,संपत्ती ,वाणी ,स्मृती ,बुद्धी ,धृती ,आणि क्षमा मी आहे .55चवदा सामामध्ये बृहत साम मी 56छंदामध्ये गायत्रीछंद मी 57मासामध्ये मार्गशीर्ष 58ऋतूमध्ये वसंत ऋतू मी 59कपात करणाऱ्या वास्तूमध्ये द्यूत मी 60तेजस्वी पदार्थामधील तेज मी 61सिद्धी मी 62उद्योग मी 63 वस्तू मधील सत्व मी64यादवात श्रीकृष्ण मी 65पांडवात धनंजय मी 66मुनीमध्ये व्यास मुनी मी 67कवीमध्ये शुक्राचार्य मी 68दमनाच्या साधनात दंड मी 69नीतिशास्त्र मी 70गुह्य वास्तूमध्ये मौन मी 71ज्ञानी माणसाचे ज्ञान मी 72सर्व भूतांचे बीज मी
येथ अर्जुन म्हणे देवे ।हे अपुले आपण जाणावे ।परि देखतसे विश्व आघवे ।तुवा भरले ।10-327

No comments:

Post a Comment