Monday, September 3, 2012

vedkalin yadnya

ब्रम्हदेवाने सृष्टीची रचना करताना यज्ञासहवर्तमान प्रजा उत्पन्न केली .पुढे ते म्हणाले कि या यज्ञाच्या योगाने तुम्ही आपली अभिवृद्धी करून घ्या ,हा तुमच्या इष्ट कामना पूर्ण करील .;अ ३-ओवी १०
ओम यद्नेन यद्न मजयंत देवाः ।तानि धर्माणी प्रथामान्यास
सर्वात पहिला धर्म म्हणजे यज्ञ .यज्ञात आहुतीला महत्व .हवन म्हणजे ईश्वराप्रित्यार्थ समर्पण=यज्ञ
यज्ञात भवती  पर्जन्यः -यज्ञ -पर्जन्य -अन्न पाणी -भूतसृष्टी -कर्म अशी शृंखला आहे .जीवसृष्टीची मुलभूत प्रेरणा म्हणजे यज्ञ जीवनधारणा =यज्ञ
यज्ञ ही एक क्रिया आहे .अग्नी हे परमेश्वराचे मुख आहे .आपण अग्नीला हवी देतो ,तो आपल्याला तेज देतो ,असे हे  चक्र आहे .तुमच्यातील उर्जा व मूळ  आदिउर्जा यांचे हे चक्र आहे
चवथ्या अध्यायात द्रव्य यज्ञ ,तपो यज्ञ ,स्वाध्याय यज्ञ ,जप यज्ञ ,वाग यज्ञ ,यांचे उल्लेख येतात ,पण ज्ञान यज्ञ हा सर्व श्रेष्ठ मानला आहे .
वेद सांगतात कि प्रत्येकाने नित्य पंच महा यज्ञ करावे .ते आहेत भूत यज्ञ ,पितृयज्ञ ,देव यज्ञ ,वैश्व देव ,काकबळी इत्यादी .
आध्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले ,पण यज्ञ संस्था व कर्मकांडे  यांचा जोर कमीच झाला होता .

No comments:

Post a Comment