भगवंत म्हणतात ,या संसारात क्षर व अक्षर हे दोन पुरुष आहेत .सर्व भुते म्हणजे क्षर ,हा क्षर पुरुष आंधळा म्हणजे ज्ञान दृष्टी विहीन , वेडा म्हणजे भ्रमाने देह म्हणजेच मी ,असे मानणारा ,पांगळा म्हणजेच भौतिक गोष्टींवर अवलंबून असणारा असा आहे .
जो अक्षर पुरुष तो यथार्थ ज्ञान व विपरीत ज्ञान यांच्या मध्यभागी उभा आहे .तो यथार्थ ज्ञानाने मी ब्रम्ह असेही समजत नाही ,व विपरीत ज्ञानाने मी देह असेही समजत नाही .निव्वळ अज्ञान हे अक्षर पुरुषाचे स्वरूप होय .
क्षर पुरुषाची उपाधी म्हणजे देहविषयक कल्पना व स्वतः क्षर पुरुष हे दोन्ही जेथे लीन होतात त्याला अव्यक्त म्हणतात .आणि संपूर्ण विश्वाचा भास नाहीसा होतो ,पण आत्मबोध होत नाही त्या केवळ अज्ञान अवस्थेला अक्षर हे नाव आहे .ते अव्यक्त हे या अक्षर पुरुषाचे राहण्याचे ठिकाण आहे या अव्याक्तातुंच जीव व विश्व या कल्पनांचा जन्म व लय होतो
जे काही लहान ,मोठे ,जंगम ,स्थावर ,मन व बुद्धी याकडून जाणले जाते ,पंच महाभुतानी तयार झाले आहे ,नाम व रूप यात सापडते ,जे प्रत्येक क्षणी उत्त्पन्न होऊन नाहीसेही होते ,त्याला जग म्हणतात .३६ गुणापासून बनलेले हे साकार जगत म्हणजेच आपण असे चैतन्य मानू लागले ,असा आपलाच आपल्याला विसर पडलेल्या चैतन्याला क्षर पुरुष हे नाव आहे त्याच्यात आत्मस्वरूप आहेच ,म्हणून तो पुरुष ,पण तो शरीराशी एकरूपता मनात आहे ,जे नाशिवंत आहे ,म्हणून तो क्षर .
क्षर व अक्षर या दोन्ही पुरुषांनी संसार भरला आहे .

No comments:
Post a Comment